रजनीकांत आणि कमल हसनची भेट, चर्चेला उधाण

रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीनं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पु्न्हा चर्चेला उधाण आलंय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2018, 09:06 AM IST
रजनीकांत आणि कमल हसनची भेट, चर्चेला उधाण title=

चेन्नई : रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीनं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पु्न्हा चर्चेला उधाण आलंय.. कमल हसन यांनी आज दुपारी रजनीकांत यांच्या घरी स्नेहभोजन घेतलं.. ही सदिच्छा भेट असल्याचं दोन्ही सुपरस्टार नेत्यांकडून सांगण्यात आलं.

राजकारणात केवळ प्रसिद्धीसाठी नाही...

राजकीय दौऱ्याची माहिती देण्यासाठी रजनीकांत यांची भेट घेतल्याचं कमल हसन यांनी यावेळी सांगितलंस त्याला रजनिकांत यांनीही दुजोरा दिला.. कमल हसन यांनी राजकारणात केवळ प्रसिद्धीसाठी पाऊल ठेवलेले नाही, तर तामिळनाडूतील लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. 

कमल हसन नव्या पक्षाची घोषणा करणार

या कार्यात त्यांना यश मिळो, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे रजनीकांत म्हणाले. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. तर रजनिकांत यांनीही तामिळनाडूत विधानसभेच्या सर्व 234 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय.. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.