केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीर दौऱ्यावर

राजनाथ सिंहांचा अमरनाथ संस्थानलाही भेट देण्याचाही कार्यक्रम आखण्यात आलाय.

Updated: Jul 4, 2018, 11:04 AM IST
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीर दौऱ्यावर title=

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावर आज (४ जुलै) प्रथमच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. काश्मीर  खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल देखील काश्मीरमध्ये जात आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात राजनाथ सिंह विविध सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतील. उद्या राजनाथ सिंहांचा अमरनाथ संस्थानलाही भेट देण्याचाही कार्यक्रम आखण्यात आलाय.

...आणि  मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळलं

सत्ताधारी पीडीपीसोबत तीन वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपनं 'काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाचं' कारण पुढे करत आपलं समर्थन मागे घेतलंय. त्यामुळे राज्यातील मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळल. जम्मू - काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर राज्यात राज्यपाल शासन लागू झालंय. 

राज्यात आठव्यांदा राज्यपाल शासन

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, गेल्या ४० वर्षांत आठव्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू होण्याची ही आठवी वेळ आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा १९७७ मध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आलं होतं.  सद्यचे राज्यपाल एन एन वोहरा यांच्याच कार्यकाळातील राज्यपाल शासनाची ही चौथी वेळ आहे. वोहरा २५ जून २००८ रोजी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी विराजमान झाले होते.