पावसाचं पाणी किती शुद्ध असतं? ते आपण पिऊ शकतो का? जाणून घ्या

तसे पाहाता पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे. परंतु अनेकांचा या पाण्याबद्दल वेगवेगळा गैरसमज आहे.

Updated: Jul 14, 2022, 04:52 PM IST
पावसाचं पाणी किती शुद्ध असतं? ते आपण पिऊ शकतो का? जाणून घ्या title=

मुंबई : पृथ्वीवर पाणी हे मुबलक आहे, परंतु स्वच्छ, पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाण्याची फारच कमतरता आहे. ज्यामुळे बहुतांश भागात सुका दुष्काळ पडतो. तर काही भागात पाणी कपातची समस्या उद्भवते. यामुळेच जगातील अनेक लोक आजही स्वच्छ आणि सुरक्षित पाण्यापासून वंचित आहेत. पण शुद्ध पाणी मिळणेही तितकेसे अवघड नाही. पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत ज्यात महासागर, नदी, तलाव, भूगर्भातील पाणी, पावसाचे पाणी प्रमुख आहेत. मात्र शुद्ध पाणी कुठून मिळणार हा प्रश्न उपस्थित राहातो.

तसे पाहाता पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे. परंतु अनेकांचा या पाण्याबद्दल वेगवेगळा गैरसमज आहे. एक काळ असा होता की त्यावेळी पाण्याची कोणतीही कमतरता नव्हती. तलाव, विहिरी, नद्या सर्वत्र पाणी उपलब्ध होते. परंतु आता मात्र पिण्यायोग्य पाणी कमी झालं आहे.

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की बाटलील पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं, या बाटलीमधील पाणं येतं तरी कुठून? तसे पाहाता यामध्ये भरले जाणारे पाणी हे पावसाचे आहे. होय याबद्दलचे अनेक पुरावे देखील समोर आले आहेत.

पावसाच्या पाण्याची शुद्धता

नद्या आणि कालव्यांचे बहुतांश पाणी पावसाचे आहे. नळांमध्ये येणाऱ्या पाण्याचा मुख्य स्त्रोतही पाऊस आहे. आपण हे शाळेत शिकलोच आहे की, पृथ्वीवरील पाणी ढगांपर्यंत पोहोचते, ते बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे पोहोचते, त्यानंतर ते पावसाद्वारे पृथ्वीवर पोहोचेपर्यंत शुद्ध होते.

आता प्रश्न हा उपस्थीत राहातो की, पाणी प्रदूषित होतेच कसे?

जगात पृथ्वीवर कोणतेही पाणी असेल तर ते केवळ पावसाच्या पाण्यातून आले आहे. जेव्हा कारण जमिनीच्या आत जाते तेव्हा ते खनिज पाणी बनते कारण जमिनीखालील खनिजे त्यात विरघळतात. तरीही हे पाणी तुलनेने सुरक्षित आणि स्वच्छ आहे. पावसाचे पाणी जिकडे तिकडे जाते, त्याच्याशी जुळवून घेते. परंतु ते त्यामध्ये कचरा, केमिकल, सांडपाणी मिसळले गेले तर ते पाणी प्रदूषित होते.

पावसाचे पाणी सर्वात शुद्ध कधी असते

जोपर्यंत पाणी जमीनीवर पडत नाही, तोपर्यंत ते सर्वात शुद्ध पाणी आहे. म्हणूनच हे पाणी प्रदुशीत होण्याआधीच ते साचवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.