रेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

Share Market : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहेत. रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सहामहिन्यापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आता 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Jan 23, 2024, 11:58 AM IST
रेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख title=

Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. यामध्ये सरकारचा रेल्वे इन्फ्रा बूस्ट आघाडीवर आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.   

शनिवारी (20 जानेवारी 2024) अस्थिर व्यापार सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला होते.  निफ्टी 21,600 च्या आसपास बंद झाला. तर दिवसअखेर सेन्सेक्स 259.58 अंकांनी अर्थातच 0.36 टक्क्यांनी घसरून 71,423.65 वर आणि निफ्टी 36.70 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 21,585.70 वर पोहोचला. तर दुसरीकडे आज (23 जानेवारी 2023) बाजार उघडताच रेल्वेच्या एका शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. 

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC), भारतीय रेल्वेच्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करणार्‍या सरकारी कंपनीचा मंगळवारी (23 जानेवारी) बाजार उघडताच 9 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला. तर IRFC चा बाजार हिस्सा 2.3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दरम्यान IRFC शेअर्सने 9.2 टक्क्यांनी झेप घेत 192.80 रुपयांच्या नवीन उच्चांकावर झेप घेतली.

 रेल्वेच्या या शेअर्सची किंमत 20 जानेवारी 2024 ला 176.22 वर बंद झाली. सुरुवातीच्या अर्ध्या तासाच्या सत्रात शेअरमध्ये मोठी चढ-उतार झाली. इंट्राडे शेअरने 166.10 ची नीचांकी पातळी देखील दर्शविली होती. तर बीएसईवरील स्टॉकचे मार्केट कॅप 2.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये रेल्वे PSU कंपनी IRFC चे मार्केट कॅप केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये 80,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. म्हणजेच मार्केट कॅप सुमारे 61 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात मार्केट कॅपमध्ये 1.67 लाख कोटी रुपयांची (5 पट) वाढ झाली आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC)ने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या स्टॉकने 1 महिन्यात 80 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी CAPEX सुमारे 25% वाढण्याची शक्यता आहे. वाढलेला CAPEX 300-400 वंदे भारत गाड्या सुरू करण्यासाठी देखील खर्च केला जाईल. रेल्वेचे सुरक्षा बजेट जवळपास दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

 

 

 

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)