नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मेघालय दौऱ्यावर असतांना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 2 दिवस मेघालय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान दिल्ली-गुवाहाटी फ्लाईटमध्ये सहप्रवाश्याचं सामान उचलण्यासाठी मदत करणाऱ्या राहुल गांधीचं कौतूक होत आहे. तर शिलाँगमध्ये एका कार्यक्रमात जवळपास 65 हजारांचा जॅकेट घालणाऱ्या राहुल गांधींवर दुसरीकडे टीका होत आहे.
30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिलाँगमध्ये 'सेलिब्रेशन ऑफ पीस' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रोग्राममध्ये राहुल गांधी काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये तेथे पोहोचले. या जॅकेटवरुन भाजपच्या मेघालय यूनिटने राहुल गांधीवर टीका केली.
भाजप मेघालय यूनिटच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन त्यांनी ट्विट करुन जॅकेटचा फोटो आणि त्याची किंमत देखील पोस्ट केली आहे. असे जॅकेट वन टू वन जॅकेट ब्रिटिश लग्जरी फॅशन ब्रँड बरबरी बनवतो. ब्लूमिंगडेल्स वेबसाईटच्या मते जॅकेटची किंमत 65145 रुपये आहे.