वयाच्या 52 व्या वर्षीही सिंगल का? Rahul Gandhi यांनी दिलं उत्तर; पालकत्वाबद्दलही बोलले

rahul gandhi speaks on having kids and marriage: इटलीमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस खासदार असलेल्या राहुल गांधींनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

Updated: Feb 22, 2023, 12:55 PM IST
वयाच्या 52 व्या वर्षीही सिंगल का? Rahul Gandhi यांनी दिलं उत्तर; पालकत्वाबद्दलही बोलले title=
rahul gandhi

Rahul Gandhi On Marriage: आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि आजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासारखे गुण असलेल्या जोडीदाराबरोबर संसार करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काही दिवसांनंतर काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आता मुलांसंदर्भात विधान केलं आहे. इटलीमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी हे विधान केलं आहे. आपल्यालाही मुलं असतील तर नक्कीच आवडेल असं सांगतानाच वायन्नाडचे खासदार असलेल्या राहुल गांधींनी कौटुंबिक नातेसंबंधांबद्दल भाष्य केलं.

52 व्या वर्षी सिंगल का?

इटलीची राष्ट्रीय भाषा असलेल्या इतालवी भाषेतील 'कोरिरे डेला सेरा' नावाच्या वृत्तपत्राला राहुल गांधींनी मुलाखत दिली. आपण लग्न करुन पालकत्वाचं सुख अनुभवावं असा विचार अनेकदा मनात येतो, असंही या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले. 52 वर्षांच्या वयातही तुम्ही सिंगल का आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधींनी, "मला याबद्दल माहिती नाही," असं उत्तर दिलं.

भारत जोडोबद्दलही भाष्य

राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये नुकत्याच संपलेल्या 'भारत जोडो यात्रे'मधील अनुभवही शेअर केले. ही यात्रा माझ्यासाठी एक तपस्येप्रमाणे होती, असं राहुल गांधी म्हणाले. हिंदू आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाबद्दल विचारण्यात आलं असत त्यांनी होय असं ध्रुवीकरण घडत असल्याचं सांगितलं. मात्र या ध्रुवीकरणाचा उपयोग मूळ मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केला जात असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 

...तर भाजपाला पराभूत करु शकतो

भारतीय राजकारणाबद्दल बोलताना राहुल गांधींनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमुळे लोकशाही संस्था डगमगत आहेत. सत्ताधारी भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. विरोक्षी पक्षाकडून भारतातील लोकांना एक चांगला पर्याय दिला जाऊ शकतो. विकास, शांतता आणि एकतेवर आधारित ठोस रोडमॅप विरोधक सध्याच्या सत्ताधाऱ्यांना पर्याय म्हणून उभा करु शकतात. याच माध्यमातून सत्ताधारी पक्षाला खाली खेचता येईल असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.