लग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर

लग्नाबाबत होत असलेल्या चर्चांवर आता खुद्द राहुल गांधींनीच प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Oct 26, 2017, 08:02 PM IST
लग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर  title=

नवी दिल्ली : लग्नाबाबत होत असलेल्या चर्चांवर आता खुद्द राहुल गांधींनीच प्रतिक्रिया दिली आहे. माझा नशिबावर विश्वास आहे, त्यामुळे जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा होईल, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगनं विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी हे उत्तर दिलं आहे.

विजेंदर सिंगनं खेळाबाबत विचारलेल्या प्रश्नावरही राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. मी व्यायाम, रनिंग, स्विमिंग करतो तसंच आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. मी खेळतो पण लोकांसमोर या गोष्टीबद्दल बोलत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

माझ्या आयुष्यात खेळाचं महत्त्व होतं आणि राहणार आहे. दिवसातला एक तास मी खेळतो पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला खेळायला वेळ मिळाला नसल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.

पाहा काय म्हणाले राहुल गांधी