हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत.
हैदराबाद 'एनसीसी'बद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधींना आपल्याला एनसीसी ट्रेनिंग आणि प्रक्रियेबद्दल फारसं माहीत नसल्याचं प्रांजळपणे कबूल केलं. त्यांना एका विद्यार्थीनीनं एनसीसीबद्दल प्रश्न केला होता.
कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी शनिवारी मैसूरस्थित महारानी आर्टस कॉलेज फॉर विमेनच्या विद्यार्थींनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थीनींनी त्यांना अनेक मुद्दयांवर प्रश्न विचारले.
'एनसीसीमध्ये सी सर्टिफिकेट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सुविधा द्याल?' असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थीनीनं विचारला. या प्रश्नावर राहुल गांधी काही वेळ शांत राहिले... त्यानंतर त्यांनी आपल्याला यासंबंधी जास्त माहिती नसल्याचं सांगितलं. परंतु, एक युवा भारतीय असल्यानं मी तुम्हाला मेहनत आणि मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला देईन, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. तर राहुल गांधी यांनी सच्चेपणाच दाखवलाय, असं सांगत काही जण त्यांचा बचावही करत आहेत.