भोपाळ : मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलयं.
पोलिसांच्या गोळीबारात मंदसौर तालुक्यात केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांच्या शेतक-यांच्या कुटुंबियांना भेटीसाठी निघालेल्या राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे नेते मंदसौरकडे निघाले होते.
पोलिसांनी सुरूवातीला त्यांना निभोरा गावाजवळ रोखलं. पण तिथून त्यांनी मोटरसाकलवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्यांना नीमच गावाजवळ ताब्यात घेतलं.