मुंबई : सोशल मीडियावर असंख्या फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा ते मनोरंजनात्मक असतात तर अनेकदा ते माहिती देणारी असतात. काही व्हायरल फोटो आपली बुद्धमापण चाचणी घेतात. त्यांच्यात असे काही कोडं असतं ते उलगडताना आपल्या मेंदूला ताण द्यावं लागतं. असाच एक फोटो सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. त्यामध्ये झाडावर बसलेले काही बिबटे दिसत आहेत. परंतू प्रत्यक्षरित्या एकच बिबट्या दिसतो. त्यामुळे या फोटोमध्ये नक्की किती बिबटे आहेत? हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा...
आपण लहानपणापासून वेगवेगळी कोडं सोडवत असतो. ही कोडी लगेच सुटत नसली तरी आपल्या बुद्धीची किंवा तीक्ष्ण नजरेची चाचणी जरूर घेतात. अनेकदा या कोड्यांची उत्तरं खूपच सोपी असतात. परंतू आपण वेगळाच विचार करीत असतो. त्यामुळे त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाही. या फोटोमध्ये देखील नक्की किती बिबटे आहेत. हे तुम्हाला शोधायचं आहे.
चला तुमच्याकडे 30 सेकंद आहेत.. नीट शोधात की या फोटोमध्ये नक्की किती बिबटे आहेत..???
?
...
?
....
मिळालं उत्तरं ? लावा डोकं
या फोटोमध्ये दोन बिबटे आहेत. एक बिबट्या तुम्हाला स्पष्टच दिसत आहे. परंतू त्याच्या तोंडाजवळ आणखी एका बिबट्याची शेपटी दिसत आहे. तो बिबट्या दोन खोडांच्या मध्ये दिसतोय... त्यामुळे या फोटोमध्ये 2 बिबटे आहेत. हे त्याचं योग्य उत्तर आहे.