मंत्र्याने Video Call वर तरुणीला कपडे काढायला सांगितले; महिला आयोगाकडून 'त्या' व्हिडीओची दखल

Minister Objectionable Video Call To 21 Year Old Girl: या प्रकरणामध्ये थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे. भाजपाच्या दिल्लीमधील एका नेत्याने हा वादग्रस्त व्हिडीओ शेअर करत कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 2, 2024, 03:08 PM IST
मंत्र्याने Video Call वर तरुणीला कपडे काढायला सांगितले; महिला आयोगाकडून 'त्या' व्हिडीओची दखल title=
भाजपाच्या दिल्लीच्या नेत्याने या आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या व्हिडीओतील स्क्रीन शॉटमधील फोटो दाखवत गंभीर आरोप (फोटो सोशल मीडिया/रॉयटर्सवरुन साभार)

Minister Objectionable Video Call To 21 Year Old Girl: पंजाबामधील एक मंत्री सध्या नको त्या कारणासाठी चर्चेत आहे. सध्या राज्यामध्ये एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आम आदमी पार्टीचे नेते बलकार सिंग यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये संसदीय कार्यमंत्री असलेले बलकार सिंग हे अश्लील चाळे करताना दिसत आहेत. बलकार सिंग यांच्या असा आरोप की त्यांनी नोकरी मागण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. या तरुणीला नोकरी देण्याचं आश्वासन मंत्र्याने दिलं. त्यानंतर या मंत्र्याने संबंधित तरुणीला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवर या मंत्र्याने तरुणीला कपडे काढण्यास सांगितले. नंतर हा मंत्री व्हिडीओ कॉलवर ती मुलगी असताना अश्लील चाळे करु लागला.

महिला आयोगाने घेतली या वादग्रस्त व्हिडीओची दखल

आता या व्हिडीओची दखल थेट राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. बलकार सिंग यांच्या या कथित व्हायरल व्हिडीओसंदर्भात महिला आयोगाने पोलिस महासंचालकांकडून तीन दिवसांमध्ये अहवाल मागवला आहे. कार्यालयीन कालावधीचा विचार करता हा अहवाल सोमवारपर्यंत आयोगाला मिळणं अपेक्षित आहे.

केजरीवाल यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

पंजाबमधील लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी या व्हिडीओवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण द्यावं असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून कोणत्याही कारवाईची अपेक्षा आपल्याला नाही. मात्र केजरीवाल यांनी या मंत्र्याविरोधात काय कारवाई केली जाणार आहे हे सांगावं, असं चन्नी म्हणाले.

भाजपाच्या नेत्याने शेअर केलेला व्हिडीओ

दिल्लीचे भाजपाचे नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ही फार लज्जास्पद बाब असल्याचं म्हटलं होतं. पंजाबमधील एक तरुणी मंत्र्याकडे नोकरी मागण्यासाठी गेली आणि तिला नोकरी देण्याऐवजी भवगंत मान सरकारच्या मंत्र्याकडून तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं जातं. आया-बहिणींवर वाईट नजर ठेवणाऱ्या मंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याची टीका अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठिया यांनी केली होती.

(Desclaimer: हा व्हिडीओ बलकार सिंग यांचा आहे की नाही याला झी 24 तास डॉट कॉम दुजोरा देत नाही.)