Punjab Drug Impact : पंजाबच्या काही भागात ड्रग्जची विक्री होत असल्याचं स्थानिकांचं म्हणण आहे. त्यामुळे या भागावर पोलिसांची करडी नजर असते. अशातच अमृतसरच्या मकबूलपुरा भागातील एका तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरूणीने ड्रग्जचं इतक्या प्रमाणात सेवन केलं की तिला उभंही राहता येत नसल्याचं दिसत आहे.
तरूणीला एक पाऊलही पुढे टाकण्यासाठी ती वाकलेली असून तिला अजिबात हालचाल करता येत नसल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिखांसाठी पवित्र शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकबूलपुरा ड्रग्जशी संबंधित घटनांमुळे अनेकदा चर्चेत असतो.
video of Maqbulpura, notorious for drugs in #Amritsar, is viral. In which the newly married girl is in a state of intoxication? He is not even standing well. subject of investigation.Where is Punjab going? @BhagwantMann remembers the election promise#Punjab #Drug @cpamritsar pic.twitter.com/vXdvJN0Lrp
— Parmeet Singh Bidowali (@ParmeetBidowali) September 11, 2022
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मकबूलपुरा पोलिसांनी रविवारी परिसरात शोध मोहीम सुरू केली परंतु यश आले नाही. मात्र, झडतीदरम्यान पोलिसांनी तिघांना अवैध अमली पदार्थांसह अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. या शोधादरम्यान पोलिसांनी अन्य 12 संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमृतसर पूर्वच्या आप आमदार जीवनज्योत कौर यांनीही चिंता व्यक्त केली आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याबाबत बोलताना त्यांनी याप्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याचेही सांगितलं आहे.