पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझीला लष्कराचा घेराव

या चकमकीत पुलवामा हल्ल्याच्या तीन मास्टरमाईंडपैकी एक असलेला अब्दुल रशिद गाझी अडकला असल्याची माहिती समोर येत आहे.

Updated: Feb 18, 2019, 10:15 AM IST
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझीला लष्कराचा घेराव  title=

पुलवामा : पुलवामा जवळ सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. पुलवामा जिल्ह्यात पिंगलान इथं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी ही चकमक सुरू आहे. या चकमकीत पुलवामा हल्ल्याच्या तीन मास्टरमाईंडपैकी एक असलेला अब्दुल रशिद गाझी अडकला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला मारण्यासाठी अथवा जिवंत पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.  चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद झालेत. मेजर डीएस डोंडियाल, सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सावे राम, आर्मीचे सैनिक अजय कुमार आणि हरी सिंग यांना हौतात्म्य आले आहे. पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर हे चकमकीचे ठिकाण आहे. 

J&K: पुलवामा में सुरक्षाबलों-आतंकियों के बीच मुठभेड़ जारी, सेना के मेजर सहित 4 जवान शहीद

गाझी हा पुलवामा आत्मघातकी हल्ल्यामधील मास्टरमाईंड मानला जातो. अब्दुल रशीद गाझी याचा पाकिस्तानशी संबंध आहे. हा खरच गाझी आहे का हे त्याला पकडल्यावर स्पष्ट होईल. पण या भागात तो वारंवार दिसून आला आहे. जर गाझी पकडण्यात आज यश आले तर लष्करासाठी खूप मोठे यश मिळणार आहे. 

नक्षलग्रस्त भागापेक्षा जम्मू काश्मीरमधील बॉम्ब हल्ल्यात वाढ

पुलवामा आत्मघातकी हल्ल्यातील मास्टरमाईड गाझी सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात आला आहे. त्याला पकडण्यासाठी परिसराला घेराव घालण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. तेव्हा काही संशयितांना हेरले गेले आहे. या विभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना लष्करी जवान प्राण पणाला लावतात पण तिथल्या स्वत:ला मानवाधिकार अधिकारी म्हणवणारे लष्करावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात. दहशतवाद्यांशी लढताना काश्मिरमधल्या कोणत्याही माणसाला इजा झाली नाही पाहीजे. घरे कोसळली नाही पाहीजे याची काळजी घ्या असे सांगितले जाते. यामध्ये लष्करी जवानांचे जीव जात आहेत. जोपर्यंत स्थानिक लोक लष्कराला सहकार्य करत नाहीत तोपर्यंत दहशतवाद्यांशी लढणे कठीण असल्याचे भिती वर्तवण्यात येत आहे.