प्रियंका गांधी बेपत्ता, रायबरेलीत लागले पोस्टर्स

रायबरेलीत अशी पोस्टर्स लागल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ

Updated: Oct 24, 2018, 01:48 PM IST
प्रियंका गांधी बेपत्ता, रायबरेलीत लागले पोस्टर्स title=

रायबरेली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा या बेपत्ता असल्याचे पोस्टर लागल्यामुळे देशभरात एकच चर्चा रंगली आहे. रायबरेली मतदारसंघात त्या अनेक दिवसांपासून आल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. रायबरेली हा प्रियंका गांधी यांच्या आई आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. काँग्रेससाठी हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे.

प्रियंका गांधी बेपत्ता असल्याचे अनेक पोस्टर्स मतदारसंघात लागल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. 'प्रियंका यांच्या शेवटच्या भेटीनंतर या मतदारसंघात अनेक दुःखद प्रसंग घडले आहेत. मात्र त्या येथे येण्यास तयार नाहीत,' असं या पोस्टरमध्ये म्हणण्यात आलं आहे. या पोस्टर्सनंतर आता सोनिया गांधी या 1 आणि 2 नोव्हेंबरला रायबरेली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. या दरम्यान त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

Priyanka Gandhi

दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी हा वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे रायबरेली मतदारसंघाचे वारस म्हणून देखील पाहिलं जात आहे. य़ाआधी त्यांना काँग्रेस अध्य़क्ष बनवण्याची मागणी देखील पक्षाकडून होत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये याच मतदारसंघातून विजय मिळविला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. पण त्याच मतदारसंघात अशा प्रकारे पोस्टर्स लागल्याने हे काँग्रेस पक्षासाठी अस्वस्थ करणारे आहे.