मिराया 'आत्मनिर्भर', फोटो शेअर करत रॉबर्ट वाड्रा असं का म्हणाले?

 भाजपने मध्यंतरी आत्मनिर्भर भारत असे कॅम्पेन देशभरात चालवले होते.

Updated: Jun 24, 2022, 01:30 PM IST
  मिराया 'आत्मनिर्भर', फोटो शेअर करत रॉबर्ट वाड्रा असं का म्हणाले? title=

नवी दिल्ली : भाजपने मध्यंतरी आत्मनिर्भर भारत असे कॅम्पेन देशभरात चालवले होते. या कॅम्पेनची जितकी प्रशंसा झाली तितकीच त्यावर टीकाही झाली होती. आता याच कॅम्पेनचा आधार कॉग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. 
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या कन्येच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे नेमक्या तिला काय शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत? आणि ती किती वर्षांची झालीय हे जाणून घेऊयात...

प्रियांका गांधी वाड्रा यांची कन्या मियारा आज २० वर्षांची झाली आहे. या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता वडिल फादर रॉबर्ट वड्रा यांनी मिरायाला वाढदिवसाच्या खाश शुभेच्छा दिल्या आहेत. रॉबर्टने मियाराचे लहाणपणापासून ते मोठे होण्यापर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी छानस कॅप्शनही दिले आहे.

कॅप्शनमध्ये काय लिहलंय?
रॉबर्टने लिहिले की, 'माझी सुंदर, लाडकी मुलगी मिरायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... तू आज 20 वर्षांची झाली आहेस, तुला पाहिल्यानंतर मनात येणारा पहिला शब्द म्हणजे निर्भय, असे ते म्हणतात. 

वाड्रा पुढे लिहतात की, तू पूर्णपणे 'आत्मनिर्भर', ध्येर्यवान, सौम्य स्वभावाची आणि कुटुंबाची, आजी-आजोबा, मित्र आणि सर्वांची काळजी घेणारी मुलगी आहेस. तु सर्वांशी मैत्री आणि नाते जपते. तु एक पर्यावरण प्रेमी आहेस जी दररोज शिकण्यावर आणि समजण्यावर विश्वास ठेवते.

'मला तुझा अभिमान आहे. मी तुला प्रत्येक प्रकारची मदत देण्यासाठी तुझ्यासाठी सदैव उभा आहे. तरीही मला वाटते की मी तुमच्याकडून खूप काही शिकू शकतो. मला खात्री आहे की हे वर्ष तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन आले आहे. आशा आहे की हे तुमचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट वर्ष असेल आणि आमचे प्रेम, मैत्री आणि बंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट व्हावे, असे वाड्रा शेवटी लिहतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Robert Vadra (@robert_vadra)

दरम्यान प्रियांका आणि रॉबर्ट यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव मियारा तर मुलाचे नाव रेहान आहे. दोन्ही मुलाचे पालकांशी खूप चांगले बॉन्डींग आहे.