हे भारीय! राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता हे Gifts, कसे ते पाहाच...

Presidents Gifts : राष्ट्रपतींना विविध दौऱ्यांवर विविध देशांच्या प्रतिनिधींपासून भेटीसाठी येणाऱ्या अनेकांपर्यंत प्रत्येकजण भेटीसाठी काही गोष्टी भेट स्वरुपात दिल्या जातात.   

सायली पाटील | Updated: Aug 6, 2024, 09:44 AM IST
हे भारीय! राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता हे Gifts, कसे ते पाहाच...  title=
Presidents Gifts soon to be auctioned you can buy those gifts latest updates

Presidents Gifts : कोणत्याही देशांचे प्रतिनिधी ज्यावेळी एखाद्या परराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्या प्रतिनिधींना अमुक राष्ट्रांकडून काही भेटवस्तू दिल्या जातात. फक्त दौऱ्यांवरच नव्हे, तर स्वत:च्या देशातही विविध प्रसंगी, विविध कार्यक्रमांच्या वेळी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना काही खास भेटवस्तू दिल्या जातात. भारताच्या राष्ट्रपतींच्या वाट्यालाही अशा काही कमाल भेटवस्तू आल्या असून, यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पेंटिंग आणि तत्सम इतर काही गोष्टींचा समावेस आहे. 

आता तुम्ही म्हणाल की या भेटवस्तूंचं काय? तर, अद्वितीय पेंटिंग, भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आणि इतर 250 भेटवस्तूंचा नजर रोखणारा खजिना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातडे असून, सोमवारपासून (5 ऑगस्ट 2024) या भेटवस्तूंची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. 

तुम्हीही खरेदी करू शकता यातील एखादी वस्तू 

राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हीही या भेटवस्तूंवर बोली लावू शकता. या संपूर्ण भेटवस्तूंच्या खजिन्यामध्ये नेताजींची पेंटिंग आकर्षणाचा विषय असून, ती एका फ्रेम स्वरुपात पाहता येत आहे. लिलावामधील ही फ्रेमच सर्वाधिक महागडी भेटवस्तू असून, तिची किंमत आहे 4,02,500 रुपये. 

उपलब्ध माहितीनुसार या कलाकृतीमध्ये नेताजींचं चित्र अतिशय बारकावे टिपत साकारण्यात आलं आहे. शिंपल्यांच्या नाजुक तुकड्यांच्या माध्यमातून हे चित्र साकारण्यात आलं असून, त्यामध्ये नेताजी आझाद हिंद सेनेनेच्या गणवेशात पाहता येत आहेत. 

हेसुद्धा वाचा : भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं नाव; एवढी जमीन तर सरकारच्या नावावर पण नाही

 

साधारण 14.15 किलोग्रॅम वजनाच्या या चित्ररुपी फ्रेमच्या वरच्या भागावर असणारं चिन्हं 30 डिसेंबर 1943 मध्ये पोर्ट ब्लेअरमधील नेताजींच्या पहिल्यांदाच तिरंगा फडकावण्याच्या ऐतिहासिक घटनेच्या 75 व्या वर्षाचं प्रतीक समजलं जात आहे. लाखोंच्या किमतीपासून या लिलावामध्ये 82500 ते 2700 रुपयांपर्यंतच्या वस्तू पाहायला मिळत असून, फक्त राष्ट्रपती मुर्मूच नव्हे, तर दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी यांना मिळालेल्या काही भेटवस्तूसुद्धा या लिलावामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.