नवी दिल्ली : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी मारले गेले. यांचे पार्थिव १३ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश आर.एस.चौहान यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत. जर महबूब नगरच्या सरकारी रुग्णालयात हे पार्थिव ठेवण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना हैदराबाद सरकार संचलित गांधी रुग्णालयात नेले जाऊ शकेल असेही न्यायालयाने म्हटले.
#TelanganaEncounter case: Telangana High Court orders to preserve the bodies of the accused (in rape and murder of woman veterinarian), till December 13. The matter has been posted for hearing on December 12.
— ANI (@ANI) December 9, 2019
आरिफ (वय २६ वर्ष), चिंताकुंटा चेन्नाकेशवुलू (वय २० वर्ष), लॉरी क्लिनर जोलू शिवा (वय २० वर्ष) आणि जोलू नवीन (वय २० वर्ष) अशी या चौघा आरोपींची नावे आहेत. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले. हैदराबादचं हे एन्काऊंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या चारही आरोपींचं पार्थिव ९ डिसेंबर रात्री ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे देश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले होते.
घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पोलिसांवर गोळीबारही केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला, यामध्ये ते मारले गेले, असं पोलीस उपायुक्त शमशाबाद प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. हैदराबाद शहरापासून ५० किमी लांब शादनगर शहराच्या चाटनपेल्लीमध्ये सकाळी ६ वाजता हे एन्काऊंटर करण्यात आले.
या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला सर्व प्रकार जगासमोर आणला. सायराबाद पोलीस आयुक्त वी सी सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेतली. 'आरोपींनी गुन्हा कबुल केल्यानंतर त्यांना घटनास्थळी नेण्यात आले. घटनास्थळावरून आणखी काही पुरावे मिळवण्याकरता त्यांना नेण्यात आलं. त्यावेळी आरोपींनी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून घेतले आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याचे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे'