साता जन्माची शपथ घेतली, पण लग्नाच्या काही महिन्यातच पतीला संपवण्याची सुपारी दिली, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

सात जन्म जिच्यासोबत राहण्याची शपथ घेतली होती त्याच धर्मपत्नीने घात करत पतीला कायमचं संपवलं. 

Updated: Aug 5, 2022, 09:42 PM IST
साता जन्माची शपथ घेतली, पण लग्नाच्या काही महिन्यातच पतीला संपवण्याची सुपारी दिली, वाचा नेमकं काय आहे प्रकरण title=

Crime News : पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्म जिच्यासोबत राहण्याची शपथ घेतली होती त्याच धर्मपत्नीने घात करत पतीला कायमचं संपवलं. धक्कादायक म्हणजे पतीला गोळी लागल्यावर त्याने सुपारी दिलेल्या पत्नीलाच फोन केला होता. पप्पू गुप्ता असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?
बिहारमधल्या किशनगंज इथे राहणारा पप्पू गुप्ता आणि प्रीतीचं लग्न झाल्यावर काही दिवसातच पप्पूचा भाऊ राजू घरी आला होता. प्रीती आणि राजूची ओळख झाली आणि दोघांचं सूत जुळलं. इथून दिराची आणि वहिनीची प्रेम कहाणी सुरू झाली. दुसरीकडे पप्पूला याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती.

राजू प्रीतीला नर्सिंग कोर्ससाठी मेडिकल कॉलेजला सोडण्यासाठी जायचा. दोघांवर कोणालाही संशय यायचा नाही. काही दिवसांनी पप्पूला दोघांच्या नात्याबाबत शंका आली म्हणून तो प्रीतीला यावरून बोलू लागला. प्रीतीला या सगळ्याचा कंटाळा आला. मग तिने प्रेमासाठी आपल्या नवऱ्याला म्हणजेत पप्पूला संपवण्याचं ठरवलं.

असा रचला कट-
प्रीतीने आणि राजूने एका गुंडाला पप्पूला संपवण्यासाठी 1 लाखाची सुपारी दिली. आधी 20 हजार दिले तर उरलेली रक्कम काम झाल्यानंतर असं ठरलं. नेहमीप्रमाणे 26 जुलैला पप्पू कामावरून येत होता. ही खबर पत्नीने गुंडाला दिली, सुपारी घेतलेल्या गुंडाला आपल्या साथीदारांसोबत पप्पूला थांबवत त्याच्यावर गोळी झाडली. 

हल्ला झाल्यावर पप्पू गंभीर जखमी झाला होता, त्यावेळी शेवटचा फोन आपल्या पत्नीला लावला. पप्पूचा फोन आल्यावर प्रीतीने राजूला फोन करत याबाबत माहिती दिली. 

पोलिसांनी असा लावला शोध
पप्पू गुप्ताच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ गाडी घटनास्थळी दिसली. पोलिसांना त्या गाडीच्या नंबरच्या आधारे मालकाला गाठलं. त्यावेळी ही गाडी काही जणांनी भाड्याने घेतल्याची माहिती मिळाली. पोलिस त्या आधारे शोध घेत हत्येची सुपारी घेतलेल्या आरोपींपर्यंत पोहचले.

पोलिसांना आरोपींकडून मृताची पत्नी प्रीती आणि मृताचा भाऊ राजू यांचे कॉल डिटेल्स हाती लागले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघासंह सर्व आरोपींना अटक केली.