प्रविण तोगडीयांनी विहिंप सोडली! म्हणाले, 'संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले'

ज्या लोकांनी आपल्याला विहिंप सोडण्यासाठी धमकी दिली. तसेच, संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले अशा लोकांची काही दिवसांत आपण एक ऑडिओ क्लीपही जाहीर करू असे तोगडीया म्हणाले.

Updated: Apr 14, 2018, 10:52 PM IST
प्रविण तोगडीयांनी विहिंप सोडली! म्हणाले, 'संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले' title=

नवी दिल्ली:  गेली अनेक वर्षे विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रमुख चेहरा राहिलेले प्रविण तोगडीया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. अध्यक्षपद निवडीवरून मतभेद निर्माण झाल्यानंतर निवडणुक घेऊन अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. या निवडणूकीत १९२ पैकी ६० मते तोगडीया गटाला (राघव रेड्डी) पडली. तर, उर्वरीत सर्व मते तोगडीया विरोधी गटाला (राघव रेड्डी - १३१ मते) पडली. त्यानंतर तोगडीया यांनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देत विहिंप सोडली. जवळपास ३२ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या तोगडीया यांनी विहिंपमधून बाहेर पडताना आपण विहिंप बाहेर राहून हिंदूंच्या हक्कांसाठी लडाई लढणार असल्याचे म्हटले तसेच, आपल्याला संघटना सोडण्यासाठी मजबूर बनवल्याचेही तोगडीया यांनी म्हटले आहेत.

पुढे बोलताना तोगडीया यांनी म्हटले आहे की, आपला उद्देश हा राम मंदिर निर्माण करणे तसेच, त्यासाठी  संसदेत कायदा बनविणे हा आहे. हा कायदा आपण बनविल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण हिंदूंच्या हक्कांसाठी आणि राम मंदिरासाठी आवाज उठवल्यामुळे काही सत्तांध लोकांनी सत्तेने मदमस्त होत संघटना सोडण्यासाठी आपल्याला मजबूर केल्याचाही आरोप तोगडीया यांनी केला आहे.

दरम्यान, ज्या लोकांनी आपल्याला विहिंप सोडण्यासाठी धमकी दिली. तसेच, संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले अशा लोकांची काही दिवसांत आपण एक ऑडिओ क्लीपही जाहीर करू असे तोगडीया म्हणाले. १७ एप्रिलपासून अहमदाबादमध्ये अनिश्चित काळासाठी आपण उपोषणासाठी बसण्याची घोषणाही त्यांनी केली. पुढे बोलताना तोगडीयांनी आरोप केला आहे की, या निवडणुकीनंतर जे काही घडत आहे त्यावरून विश्व हिंदू परिषदेचे लोकही नाराज आहेत.