राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत

इकडे डाव्या पक्षांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्याची तयारी सुरू केलीय.

Updated: Jun 22, 2017, 10:01 AM IST
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत title=

नवी दिल्ली : इकडे डाव्या पक्षांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्याची तयारी सुरू केलीय.

रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणार नसल्याचं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीएम) महासचिव सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केलंय.

मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपद एकदा भूषवलंय. त्यामुळे त्यांना आणखी एक घटनात्मकपद देण्याविषयी डाव्या पक्षांचा आक्षेप आहे. त्यामुळे डावे पक्ष प्रकाश आंबेडकरांना शर्यतीत उतरवण्याची चिन्हं आहेत. 

पण स्वतः प्रकाश आंबेडकर याविषयी किती उत्सुक आहेत याबद्दल अजूनही साशंकता आहे. आंबेडकर यांनी 'झी २४ तास'ला दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत देशात आदिवासी चेहरा राष्ट्रपतीपदी असावा, अशी भूमिका मांडली होती.