PM Matritva Vandana Yojana: गरोदर महिलांना मिळतात 6 हजार रुपये, योजनेची माहिती जाणून घ्या

 केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असं आहे. 

Updated: Sep 30, 2022, 03:31 PM IST
PM Matritva Vandana Yojana: गरोदर महिलांना मिळतात 6 हजार रुपये, योजनेची माहिती जाणून घ्या  title=

PM Matritva Vandana Yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असं आहे. भारत सरकारनं या योजनेची सुरुवात 2017 मध्ये केली होती. देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत गरोदर महिलेला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या माध्यमातून आरोग्य संदर्भातील सुविधा, चांगला आहार देण्याचा हेतू आहे. चला जाणून घेऊयात मातृत्व वंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत, सरकार गरोदर महिलांना तीन टप्प्यांत 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार, तिसऱ्या टप्प्यात 2 हजार आणि बाळाच्या जन्माच्या वेळी 1 हजार रुपये दिले जातात. यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana आयडीवर क्लिक करून अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत ऑफलाइन देखील अर्ज करू शकता. 

UPSC उमेदवारांसाठी App लाँच, भरती आणि परीक्षांची माहिती मिळणार एका क्लिकवर

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. या योजनेत फक्त त्या महिला अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेता येत नाही.