मोदींनी केला सनसनाटी आरोप, उडाली एकच खळबळ

गुजरात विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 03:14 PM IST
मोदींनी केला सनसनाटी आरोप, उडाली एकच खळबळ title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. 

मोदींचा सनसनाटी आरोप

शेवटच्या दोन दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वपक्षीय दिग्गज आज आणि उद्या पराकोटीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान गुजरात निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

अनेकांची घेतली नावे

अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप साणंदमध्ये झालेल्या सभेत केला गेला आहे. त्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी सहा डिसेंबरला पाकिस्तानचे माजी पराराष्ट्र मंत्री आणि भारतात पाकिस्तानचे माजी उच्चयुक्त यांची गुप्त बैठक झाल्याचा मोदींनी दावा केला आहे. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी हे देखील उपस्थित होते.

मोदींबद्दल वापरले अपशब्द

मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेली है बैठक तब्बल तीन तास चालली. यानंतर लगेच म्हणजे दुसऱ्याच दिवशी अय्यर यांनी मोदींना नीच म्हणून संबोधले असंही मोदींनी म्हटलं. अर्थातच या बैठकीत निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा पंतप्रधानांचा आरोप आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.