PM KISAN | शेतकरी मायबापांनो, 6 हजार रूपये हातचे जाऊ देऊ नका, 31 मार्च आहे शेवटची तारीख

या योजनेचे पैसे केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या

Updated: Mar 22, 2021, 07:57 PM IST
PM KISAN | शेतकरी मायबापांनो, 6 हजार रूपये हातचे जाऊ देऊ नका,  31 मार्च आहे शेवटची तारीख title=

मुंबई  : आपण जर शेतकरी असाल आणि आपली पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर लवकर नोंदणी करुन घ्या, कारण या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2021 देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता 31 मार्च, 2021 पूर्वी मिळण्यास सुरुवात होणार आहे. 

या योजनेचे पैसे केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. हा हफ्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान-किसान योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता होळीच्या आधी म्हणजेच 31 मार्च पूर्वी तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

6 हजार मिळवायचे असतील तर लवकर नोंदणी करा

जर आपल्याला पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचे 6 हजार रूपये मिळवायचे असतील तर 31 मार्च पूर्वी नोंदणी करुण घ्या. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी आपल्याला आपले सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ही नावाची नोंदणी करता येऊ शकेल. यासह शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करुनही नाव नोंदणी करु शकतो.

 हप्ता जमा झाला की नाही?

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर लॉगिन करुन पैसे जमा झालेत का नाही हे कळू शकेल.

यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.