दिवाळीत्र फराळाला एकत्र येण्याचा प्लान असेल तर हे नियम पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा

Corona virus : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दिवाळीत काय घ्यावी काळजी.

Updated: Oct 22, 2022, 06:58 PM IST
दिवाळीत्र फराळाला एकत्र येण्याचा प्लान असेल तर हे नियम पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा title=

मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona) 2 वर्ष लोकांना दिवाळी साजरी करता आली नाही.  पण यंदा 2 वर्षानंतर दिवाळीचा (Diwali) मोठा उत्साह दिसू लागला आहे. यंदाची दिवाळी खूप खास आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा दिवाळीनिमित्त बाजारपेठेतील दुकाने ही सजली आहेत. दिवाळीसाठी लोकं भरभरुन खरेदी करत आहेत. पण पुन्हा एकदा Omicron च्या नवीन उप-प्रकार BA.5.1.7 आणि BF.7 ने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. भारतातील गुजरातमध्ये या नवीन उप-प्रकाराचे एक प्रकरण समोर आले आहे. ओमायक्रॉनचे हे नवीन उप-प्रकार खूप वेगाने पसरत आहे आणि यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्ये देखील प्रकरणे आढळून येत आहेत.

ओमायक्रॉनचा हा नवीन उप-प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे दिवाळीच्या या मोसमात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील आहे. प्रशासनाने लोकांना या सणासुदीत सावध राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हीही तुमच्या घरी पार्टी ठेवत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यापासून रोखता येईल.

इनडोअर आणि आउटडोअर पार्ट्यांचे (Indoor and Outdoor party) फायदे आणि तोटे असतात. कोविड-19 (Covid 19 Virus) मुळे आपले आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे चांगले आहे. त्यामुळे कोणाकडे जाताना किंवा पाहु्ण्यांना आपल्या घरी बोलवत असाल तर अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असते. त्यामुळे दमाचा त्रास असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. कोरोना झाल्यानंतर ही अनेक लोकांना श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे ज्यांना दमा किंवा श्वसनाचा कोणातीही समस्या असेल त्यांनी बाहेर जाणं टाळलं पाहिजे.

दिवाळीत जर पार्टीचं आयोजन करत असाल तर मग तुम्ही ही जाणून घेतलं पाहिजे की, आउटडोअर पार्ट्यांपेक्षा इनडोअर पार्ट्यांमध्ये कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने म्हटले आहे की, "घरातील जागा बाहेरच्या जागांपेक्षा जास्त जोखमीच्या असतात जेथे लोकांना वेगळे ठेवणे कठीण असते आणि इनडोअर पार्ट्यांमध्ये वेंटिलेशन देखील अधिक कमी प्रमाणात होत असते.'

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी इनडोअर पार्ट्यांऐवजी खुल्या जागेवर पार्टीचं आयोजन करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. कोविड-19 हा संसर्गजन्य आजार आहे. जो खोकल्यामुळे, शिंकण्याने, बोलण्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. अशा परिस्थितीत, आपण किमान लोकांना दिवाळी पार्टीसाठी आमंत्रित करणे आवश्यक आहे जेणेकरून या संसर्गाचा धोका कमी होईल.

दिवाळीच्या दिवशी सगळे जण एकत्र येत असतात. पण जर तुम्हाला कोविड-19 ची लक्षणे दिसत असतील तर एकत्र येणे टाळले पाहिजे. असे केल्याने तुम्ही इतरांचा जीव धोक्यात घालू शकता. जर तुम्हाला खोकला, सर्दी, ताप, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही घरीच राहून दिवाळीचा आनंद लुटणे महत्त्वाचे आहे.

मास्क वापरा : कोविड 19 टाळण्यासाठी मास्क सर्वात महत्त्वाचा आहे. दिवाळी पार्टी आयोजित करत असाल किंवा एखाद्याच्या घरी पार्टीसाठी जात असाल तर मास्क वापरा जेणेकरून तुम्हाला कोरोनाचा धोका टाळता येईल.

सॅनिटायझर वापरा : जर तुम्ही दिवाळीला घरगुती पार्टीत जात असाल तर सॅनिटायझर सोबत ठेवायला विसरू नका. हात धुताना साबण वापरा जेणेकरून कोरोना संसर्गाचा धोका कमी करता येईल.

बुफे पद्धतीत जेवण टाळा : कोणत्याही उत्सवात अन्न महत्वाची भूमिका बजावते. परंतु तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने विषाणूचा प्रसार करू शकतो. यामुळेच पार्ट्यांमध्ये बुफे पद्धतीऐवजी प्रत्येकाला स्वतंत्रपणे सर्व्ह करावे. जरी एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल, तर अशा प्रकारे हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरू शकणार नाही.