विमानात पायलट-को पायलटला का दिलं जातं वेगळं जेवण? कारण ऐकून व्हाल थक्क

एकत्र काम करूनही पायलट आणि को पायलटसाठी वेगळं जेवणं का? तुम्हाला तरी माहीत आहे का कारण? जाणून घ्या

Updated: Mar 5, 2022, 08:55 PM IST
विमानात पायलट-को पायलटला का दिलं जातं वेगळं जेवण? कारण ऐकून व्हाल थक्क title=

मुंबई : विमानाने प्रवास करावा आणि तिथल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल सर्वांना उत्सुकता असते. मात्र अनेकांना विमानातील एक रहस्य माहिती नसेल. याच याच रहस्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विमानामध्ये पायलट आणि को पायलट एकत्र काम करत असले तरी त्यांच्या खाण्या-जेवणाची वेगळी व्यवस्था असते. यामागचं रंजक कारण आज आपण जाणून घेणार आहोत. 

आता प्रश्न पडला असेल की दोन्ही पायलटना वेगवेगळं जेवण का दिलं जातं? 1984 मध्ये कॉनकॉर्ड सुपरसॉनिक विमान लंडनहून न्यूयॉर्कला जात होते. या फ्लाइटमध्ये धक्कादायक घटना घडली. 

या फ्लाइटमध्ये एकूण 120 प्रवासी होते. त्यावेळी सर्वांना एकसारखं जेवण देण्यात आलं होतं. मात्र त्या जेवणामध्ये काहीतरी गडबड होती. ज्यामुळे सर्वांना विषबाधा झाली. अन्नातून विषबाधा झाल्याने एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी पायलट आणि को पायलटला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी अत्यंत सावधानी बाळगून एक कठोर निर्णय घेण्यात आला. पायलट आणि को पायलट या दोघांना वेगवेगळं जेवण दिलं जाईल. दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडली तर दुसरा पायलट उपलब्ध असेल. सगळे अडथळे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. 

विषबाधा किंवा काही जेवणातून कोणत्याही एका पायलटला त्रास झाला तर दुसरा व्यवस्थित सुखरुप प्रवाशांना पुढे घेऊन जाऊ शकतो हा त्यामागचा विचार आहे. पायलटला फर्स्ट क्लासचं तर को पायलटला बिझनेस क्लासचं जेवणं दिलं जातं. 

काही विमान कंपन्या कॉकपिटमध्ये क्रू मेंबर्ससाठी वेगळ्या जेवणाची सोय देखील करतात. तर पायलट आणि को पायलटसाठी वेगळी व्यवस्था केली जाते. एका मुलाखतीमध्ये कोरियन पायलटने देखील हेच सांगितलं होतं की विषबाधा होऊ नये आणि प्रवाशांना त्यामुळे समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.