कोबी चोरण्याच्या आरोपावरून अपंगाची हत्या....

कोबी चोरल्याच्या आरोपावरून एका अपंगांची जबरदस्त मारहाण करण्यात आली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 24, 2017, 10:45 PM IST
कोबी चोरण्याच्या आरोपावरून अपंगाची हत्या....  title=

सीतामढी : कोबी चोरल्याच्या आरोपावरून एका अपंगांची जबरदस्त मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार बिहारच्या सीतामढी जिल्हातील खोपरहिया गावात घडला. मृत व्यक्तीचे नाव दुलार राय (५५) आहे. 
पोलीस अधिकारी वीर धीरेन्द्र कुमार यांनी सांगितले की, रविवारी कोबी चोरल्याचा आरोपातून दुलार राय याला जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि मारहाणीतूनच त्याचा मृत्यू झाला. 

मृत व्यक्तीच्या नातेवाईकाच्या जबानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.