पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक नोंदवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. पेट्रोलचे दर चार वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले. डिेझेल तर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च आणि पर्यायायनं महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

shailesh musale Updated: Apr 2, 2018, 11:42 AM IST
पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी title=

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक नोंदवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. पेट्रोलचे दर चार वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले. डिेझेल तर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च आणि पर्यायायनं महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अबकारी करात घट नाही

केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरचा अबकारी कर कमी करावा अशी मागणी करण्यात आली होती. पण तसं काहीच झालं नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं कच्च्या तेलाच्या किमती वाढत गेल्या. जून 2017 पासून सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर दररोज निश्चित करतात. त्यामुळे दर वाढीचं प्रमाण एकदम लक्षात येत नाही.

9 वेळा अबकारी कर वाढवला

नोव्हेंबर 2014 पासून केंद्र सरकारनं नऊ वेळा पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी कर वाढवलाय. याकाळात केंद्र सरकारनं पेट्रोलियम पदार्थांवर पेट्रोलच्या एका लिटरमागे 11 रुपये 77 पैसे तर डिझेलच्या एका लिटर मागे 13 रुपये 47 पैसे कर गोळा केला.   तर केवळ एकदा म्हणजेच ऑक्टोबर 2017 मध्ये कर दोन रुपये कमी केला. याशिवाय इंधनांवर मूल्यवर्धित कर लावण्याचे अधिकार प्रत्येक राज्य सरकारला आहे. त्यामुळे आज पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी करायचे असतील, तर सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे.

आधीचे दर                                     आत्ताचे दर

नाशिक - P - 81.87, D-68.01    P-81.97  D-68.12
नागपूर - P- 80.40, D- 64         P- 82.09  D-69.31
कोल्हापूर- P-81.77, D- 76.94    P-81.87   D-68.06
औरंगाबाद-P-82.35, D-69.53    P-82.56   D-69.75
पुणे- P-81.38,   D-67.53          P-81.48   D-67.65
ठाणे- P-81.67,   D-68.87         P-81.79   D-68.99
मुंबई- P-81.61,  D-68.79         P-81.71   D-68.91  

पाहा व्हिडिओ