नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घट

नवीन वर्षात मोदी सरकारने सामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे.

Updated: Jan 1, 2019, 05:07 PM IST
नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घट title=

नवी दिल्ली: नवीन वर्षात मोदी सरकारने सामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत घट होताना दिसते आहे. महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १७ पैशांपर्यंत घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १९ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ पैशांनी घट झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ६८.६५ तर डिझेल प्रतिलिटर ६२.६६ रुपयाने मिळते आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ७४.३० रुपयाने मिळत आहे. तसेच डिझेल प्रतिलिटर ६५.५६ रुपयांना मिळते आहे. कोलकात्तामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट झाली आहे. कोलकात्तामध्ये पेट्रोलच्या दरात १८ पैशांनी घट झाली असून, पेट्रोल दर प्रतिलिटर ७०.७८ रुपये झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ७१.२२ रुपयांनी मिळणार आहे. तर डिझेल प्रतिलिटर ६६.१४ रुपये दराने मिळणार आहे. 

 

एनसीआरमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

महानगरसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पेट्रोलच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्लीतील नोएडा येथे पेट्रोल प्रतिलिटर ६८.९० रुपये तर डिझेल प्रतिलिटर ६२.२८ रुपयांना मिळणार आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ६२. १५ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ६२.१५ रुपयांनी मिळणार आहे.  फरीदाबादमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ७०.१४ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ६३.११ रुपये आहे. गुरुग्राम येथील पेट्रोलचे दर ६९.९३ रुपये आहे तर डिझेल दर प्रतिलिटर ६२.८९ रुपये आहे.