मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय ठरत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ही चिंता काहीशी कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारत होणाऱ्या घडामोडींचे पडसाद हे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर थेट परिणाम करत आहेत.
'एएनआय'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातच झाली आहे. दिल्लीत मंगळवारी पेट्रोलचे दर हे प्रति लिटर ७९ रुपये ५५ पैसे इतके असतील, तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३ रुपये ७८ पैसे असतील.
दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर २० पैशांनी आणि डिझेल ७ पैशांनी स्वस्त झालं आहे.
Petrol & diesel prices in #Delhi today are Rs 79.55 per litre (decrease by Rs 0.20) & Rs 73.78 per litre (decrease by Rs 0.07),respectively. Petrol & diesel prices in #Mumbai today are Rs 85.04 per litre(decrease by Rs 0.20) &Rs 77.32 per litre (decrease by Rs 0.08), respectively pic.twitter.com/YPLiifxBMg
— ANI (@ANI) October 30, 2018
मुंबईत पेट्रोलचे दर हे प्रति लिटर ८५ रुपये ०४ पैसे आणि डिझेलचे दर ७७ रुपये ३२ पैसे असणार आहेत.
मुंबईत पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल ८ पैशांनी स्वस्त झालं आहे.
दिवाळीच्या काही दिवसाधीच सलग तेराव्या दिवशी इंधन दरात ही कपात आढळून आली आहे. त्यामुळे आता यापुढे दरांचा हा आलेख नेमका कसा पुढे जातो याकडे अनेकांचच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे.