पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग १६व्या दिवशी वाढ

आज पुन्हा एकदा तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) इंधनाच्या दरांत वाढ केली आहे.

Updated: Jun 22, 2020, 09:24 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग १६व्या दिवशी वाढ title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरांत सतत वाढ होत आहे. आज सलग 16व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असताना दररोज वाढणारे इंधनाचे दर सामन्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. आज पुन्हा एकदा तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) इंधनाच्या दरांत वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोल किंमतीत 0.33 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर 0.58 पैशांनी वाढले आहेत.

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव 79.56 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर डिझेलचा दर 78.85 रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलचा दर 86.04 रुपये प्रति लिटर तर डिझेल 76.69 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.