Petrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आता पण वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे की नाही याबद्दल जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत.... 

Updated: Jan 9, 2023, 08:27 AM IST
Petrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर title=

Petrol Diesel Price Today : देशभरात मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) कोणताही बदल झालेल नाही, मात्र ही स्थिती आता लवकर बदलू शकते. याचे कारण असे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज (today 9 january 2023 petrol diesel rate) यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीतील बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किमती आजही स्थिर आहेत.

तर दुसरीकडे गौतम बुद्ध नगर (Noida-Greater Noida) येथे आज पेट्रोल 24 पैशांनी 97.00 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर डिझेल 21 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल 2 पैशांनी स्वस्त होऊन 96.56 रुपयांवर पोहोचले. तर डिझेल 2 पैशांनी घसरून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. पाटणामध्ये पेट्रोल 35 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर तर डिझेल 32 पैशांनी वाढून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

वाचा  : आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा 

तसेच गेल्या 24 तासांत कच्चा तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूडची किंमत $0.70 ने घसरून $79.27 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याच वेळी, WTI ची किंमत प्रति बॅरल $ 0.63 ने घसरून $ 74.40 वर आली आहे.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)

- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दर बदलले

- नोएडामध्ये पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर 
- लखनौमध्ये पेट्रोल 96.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर 
- पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.