Petrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

Petrol-Diesle Latest News:  तुम्हीही कार किंवा बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी पहाटे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केला आहे. 

Updated: Nov 14, 2022, 10:00 AM IST
Petrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट title=
today petrol diesel rate in maharashtra

Petrol-Diesel Price Today 14 November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel rate) दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. पण आज जर तुम्ही वाहनाची टाकी भरणार असाल तर त्याआधी तेलाचे नवीनतम दर नक्की तपासा. सरकारी मालकीची तेल कंपनी IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेतला जातो.

महानगरांमध्ये 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत-

 दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
 मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
 कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
 चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील दर तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांनी टोल फ्री क्रमांक शेअर केला आहे. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल, तर तुम्ही RSP 9224992249 वर एसएमएस करू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असल्यास, तुम्ही RSP एसएमएस करून 9223112222 वर एसएमएस करू शकता आणि तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची माहिती मिळवू शकता. याशिवाय, HPCL ग्राहक 9222201122 वर HPPprice पाठवून देखील जाणून घेऊ शकतात.

वाचा : बालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया… 

दररोज 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel rate) दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.