पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी वाढ

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

Updated: Jun 16, 2020, 10:01 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी वाढ title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. राजधानीत आज डिझेलचे दर 75 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले आहेत. डिझेलमध्ये आज प्रति लिटर 57 पैशांची वाढ झाली आहे. यात दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत वाढून 75 रुपये 19 पैसे झाली आहे. सोमवारी, 15 जून रोजी एक लिटर डिझेलची किंमत 74 रुपये 62 पैसे होती. सोमवारी डिझेलच्या किंमतीत 59 पैशांची वाढ करण्यात आली.

आज पेट्रोलच्या किंमतीत 47 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आता प्रति लिटर 76.73 पैसे आहेत. काल म्हणजेच सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 48 पैशांची वाढ झाली आली. सोमवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 76.26 रुपयांना मिळत होतं.

7 जूनपासून वाढ

7 जूनपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे. यापूर्वी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 12 आठवड्यांपर्यंत कोणताही वाढ केली नव्हती. 7 जूननंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे, भारतातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी होण्याचा हा काळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 39.65 डॉलर होती. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे, जगभरात कच्च्या तेलाचे दर जवळपास 3 महिने स्थिर राहिले आहेत.