पेट्रोल-डिझेल 8 महिन्यांनी इतकं झालं स्वस्त

 गेल्या 8 महिन्यात पहिल्यांदाच इतके कमी दर पाहायला मिळत आहेत.

Updated: Nov 30, 2018, 11:24 AM IST
पेट्रोल-डिझेल 8 महिन्यांनी इतकं झालं स्वस्त  title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याचा फायदा थेट सर्वसामान्यांना होतोय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याचं सत्र शुक्रवारीही सुरूच राहिलं. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलची किंमत 78.43 तर डिझेल 70.89 रुपये प्रति लीटर दराने विकलं जातय. 16 जून पासून पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हिशोबाप्रमाणे बदलत आहेत. तर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 72.87 तर डिझेल 67.72 रुपये प्रती लीटर आहे.

27 मार्चला दिल्लीमध्ये पेट्रोल 72.90 रु. लीटर दराने विकल जात होत तर  30 जुलैला डिझेल 67.75 रु. प्रती लीटर दराने विकल जात होत. त्यामुळे गेल्या 8 महिन्यात पहिल्यांदाच इतके कमी दर पाहायला मिळत आहेत.

रुपया मजबूत 

खूप मोठ्या काळाच्या घसरणीनंतर आता रुपयांत मजबूतीचा ट्रेंड सुरू झालायं.

हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. '2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता पण डिसेंबर पर्यंत भारतीय करंसी दोन ते तीन टक्क्यांनी मजबूत होऊ शकते', असं स्टैंडर्ड चार्टर्डमध्ये साउथ एशियाचे फॉरन एक्सचेंज, रेट्स आणि क्रेडिट हेड गोपीकृष्णन एमएस सांगतात.