मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.
यामुळे बुधवारी नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ७०.६२ रुपये प्रति लिटर तर डीझेलसाठी ६०.८१ रुपये प्रति लिटर मोजावे लागत होते... उल्लेखनीय म्हणजे दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेलच्या किंमती या स्तरावर दाखल झाल्यात.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याचं कारण जरी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ असली तरी केंद्र आणि राज्य सरकारनं त्यावर लावलेले मोठे करही यासाठी कारणीभूत आहेत.
सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर जवळपास २० रुपये कर वसूल करतं तर डिझेलसाठी उपभोक्ते जवळपास १५.३३ रुपये कर भरतात.