मुंबई : असं म्हणतात की, फर्ट इम्प्रेशन इज लास्ट इंप्रेशन. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल पहिल्याच भेटीत जे मत बनवतो, तेच मत त्याचं शेवट पर्यंत राहातं. त्यामुळे कधीही नवीन व्यक्तीसमोर तुमचं खराब इंप्रेशन पडू देऊ नका. बऱ्याचदा नवीन व्यक्तींसमोर आपण असे काही हातवारे करतो की, त्याचं इंप्रेशन लोकांवर खूप खराब पद्धतीनं पडतं. जर तुम्हाला एखाद्यावर चांगली छाप पाडायची असेल आणि समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्याने प्रभावित व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया असे कोणते जेश्चर किंवा बॉडी लँग्वेज आहेत, ज्यामुळे इतरांवर वाईट छाप पडू शकते.
नेहमी लक्षात ठेवा की, बोलत असताना पाठीमागे हात बांधून उभे राहू नका, त्यामुळे जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर संभाषणादरम्यान हात मागे बांधून उभे राहू नका. असे केल्याने समोरच्यावर चांगला प्रभाव पडतत नाही.
मानसशास्त्रज्ञ मानतात की, जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव टाकतो. मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जेव्हा आपलं जेश्चर असं असतं तेव्हा आपण एकतर रागावलेले असतो किंवा आपला समोरच्याचं एकण्याचा मूड नसतो. त्यामुळे कोणाशी बोलत असताना असे उभे राहू नका.
अनेक वेळा आपण पाय दुपडून उभे राहून बोलतांना पाहिले असेल. मानसशास्त्रज्ञ मानतात की, जर तुम्ही एखाद्याशी असे बोलात तर समोरच्या व्यक्तीवर चांगले संस्कार होत नाहीत. या हावभावाचा अर्थ असा आहे की, आपण जे बोलत आहात त्यावर आपला विश्वास नाही. या हावभावात तुम्ही खिशात हात घातलात तर तुमचे कोणीही गांभीर्याने ऐकणार नाही.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, लोक बोलत असताना हाताची घडी घालून उभे राहातात. एखाद्याशी बोलताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की असे केल्याने तुमची लोकांवर चांगली छाप पडणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना असे करता तेव्हा ते समोरच्या व्यक्तीवर असा प्रभाव पडतो की तुम्हाला त्याच्याशी बोलण्यात रस नाही.
बोलत असताना तोंडाला हात लावू नका : अनेकांना अशी सवय असते की, ते बोलत असताना तोंडाला किंवा चेहऱ्याला हात लावतात. आपण हे करणे टाळले पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलत असताना तोंड झाकता तेव्हा समोरच्या व्यक्तीला असे वाटते की तुम्ही त्याच्यापासून काहीतरी लपवत आहात. मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही खोटे बोलत असता तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत राहता.
कोणाशीही बोलता तेव्हा लक्षात ठेवा की बोलत असताना कधीही त्या व्यक्तीकडे बोट दाखवून बोलू नका. असे केल्याने समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो. एखाद्याकडे बोटे दाखवल्याने लोकांवर चांगली छाप पडत नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)