गोव्यात दारु खरेदीच नाही तर विक्री देखील करता येणार; परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने

गोव्यात आता परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने मिळणार आहेत. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. 

Updated: Aug 22, 2024, 12:04 AM IST
गोव्यात दारु खरेदीच नाही तर विक्री देखील करता येणार; परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने title=

Goa Liquor Permit : आतंरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणारा गोवा 'चिल आऊट डेस्टिनेशन' म्हणून प्रसिद्ध आहे.  अनेकजण मौजमजा करण्यासाठी गोव्याला जातात. दारू पिणा-यांसाठी गोवा म्हणजे नंदनवनच...गोव्यात दारू स्वस्त मिळत असल्यानं बरेच जण इथल्या दारूच्या बाटल्या राज्यात आणतात. आता मात्र, गोव्यात दारु खरेदीच नाही तर विक्री देखील करता येणार आहे. परराज्यातील लोकांना गोव्यात दारू विक्रीचे परवाने मिळणार आहेत. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे.   

गोवा सरकारने नुकताच अबकारी कायद्यात बदल केला आहे. नव्या कायद्यानुसार पर राज्यातील पालिकांना मोपा विमानतळावर किरकोळ दरात दारू विक्री करण्यास मजुंरी मिळाली आहे. सरकारने अबकारी कायद्यात केलेल्या या बदलाला स्थानिकांचा विरोध आहे. विरोधकांनी येथील सरकारच्या या निर्णयोविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.  सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाा साधला आहे.  सरकारने अबकारी कायद्यात बदल करुन चुकीचे धोरण राबल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. परराज्यातील लोकांना प्राधान्य दिले जात आहे. या निर्णयामुळे स्थानिकांवर अन्याय होणार असून त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 
 विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.  या धोरणामुळे स्थानिकांचे रोजगारावर धोक्यात येतील अशी भिती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. 

दारु विक्री हा गोव्यातील अनेकांचा पंरपारिक व्यवसाय आहे. दारू विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी 25 वर्ष वयाची अट आहे. तसेच स्थानिक रहिवाशी असणं ही देखील अट आहे. नव्या धोरणामुळे दारू विक्रीच्या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाला याचा फटका बसणार आहे. परराज्यातील बड्या कंपन्यांना दारु विक्रीचा परवाना दिल्यास  स्थानिक व्यापारी वर्ग देशोधडीला लागेल असे सरदेसाई यांनी म्हंटले आहे. दारू विक्रीचे परवाने फक्त आणि फक्त परराज्यातील लोकांना दारु विक्रीची परवागी देण्याचा निर्णय सरकारने मागे घेऊन फक्त गोव्यातील लोकांनाच हा परवाना दिला पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी पत्राद्वारे केली आहे.