चारा घोटाळ्यातील दोषी लालूंना आणखी एक धक्का...

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत न्यायालयानं जोरदार दणका दिलाय. 

Updated: Dec 23, 2017, 09:19 PM IST
चारा घोटाळ्यातील दोषी लालूंना आणखी एक धक्का...  title=

रांची : चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत न्यायालयानं जोरदार दणका दिलाय. 

रांची स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणात दोषी ठरवलंय... तर १९९० नंतर त्यांनी मिळवलेली सर्व संपत्ती जप्त करण्याचेही आदेश देण्यात आलेत. 

शनिवारी कोर्टानं या प्रकरणात लालूसमवेत १५ आरोपींना दोषी ठरवलंय... तर या प्रकरणातील इतर सात आरोपींना निर्दोष सोडण्यात आलंय. लालूंसोबत या प्रकरणात आणखी एक आरोपी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही कोर्टानं निर्दोष सोडलंय. 

९०० करोड रुपयांच्या या घोटाळ्यात लालूंसोबत आर के राणा, जहानाबादचे माजी खासदार जगदीश शर्मा हेदेखील दोषी ठरलेत.

कोर्टाच्या निर्णयानंतर लालूंना रांचीच्या बिरसा मुंडा जेलमध्ये धाडण्यात आलंय. लालूंना जेव्हा दोषी ठरवण्यात आलं त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही कोर्टात उपस्थित होते.