Corona Vaccine Stolen : चोराला पण चोरी करायचा सेन्स असावा

कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसी दिल्या जात आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी हरियाणाच्या जींद येथून बातमी एक धकाकादायक बातमी आली

Updated: Apr 22, 2021, 09:20 PM IST
Corona Vaccine Stolen : चोराला पण चोरी करायचा सेन्स असावा title=

हरियाणा : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसी दिल्या जात आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी हरियाणाच्या जींद येथून बातमी एक धकाकादायक बातमी आली की, येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून कोरोना लसींची चोरी झाली आहे. ही बातमी पसरताच रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. परंतु संध्याकाळपर्यंत एका दुचाकीस्वाराने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यासमोर असलेल्या चहाच्या दुकानासमोर प्लास्टिकच्या पिशवीत 622 कोरोना लस ठेवून दिल्या. आणि त्यामध्ये एक चिठ्ठीही ठेवली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, "मला माफ करा. त्यात कोरोना लस आहे हे मला माहित नव्हते."  या विचित्र घटनेची संपूर्ण हरियाणात जोरदार चर्चा सुरु आहे.

जींदच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून कोविशील्डच्या 1270 आणि कोव्हॅक्सिनच्या 440 लसींची चोरी झाल्याची माहिती मिळाली समोर आली आहे. सोबत एक फाईल देखील चोरीला गेली आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणारे दोन लोक आढळले ज्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.

पोलिस अधिकारी तक्रारीनंतर तपास सुरु करणार, तो पर्यंतर चोरट्यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यासमोर असलेल्या चहाच्या दुकानात चोरलेल्या लसींपैकी 622 लसी ठेवून दिल्या. यामध्ये कोव्हॅक्सिनच्या 440 आणि कोविशील्डच्या 182 लसी आहेत. आता पोलिस उर्वरित लसी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

रुग्णालयाच्या फ्रीजरमधील डोस चोरले

असे सांगितले जात आहे की, सिव्हिल हॉस्पिटलच्या पीपी सेंटरमध्ये बुधवारी संध्याकाळी शिबिरांमधून उरलेल्या 1710 लसी फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या. यामध्ये कोविशील्डच्या 1270 आणि कोव्हॅक्सिनच्या 440 लसींचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी या लसी गायब असल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, रूग्णालयातील कर्मचार्‍यांच्या संगनमताने या लसी चोरीला गेल्या आहे. सध्या सिव्हिल लाईन पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.