Pakistani journalist Loves India: भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप सुरु असून जगभरातील क्रिकेट टिम्स येथे आल्या आहेत. या टिम्ससोबत त्या देशांचे पत्रकारदेखील भारतात पोहोचले आहेत. क्रिकेटसोबत भारतातील विकास, संस्कृती, राहणीमान, खाण्याच्या गोष्टी अशा विविध गोष्टी त्यांना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारताच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. पण त्याचे हे कौतूक पाहून पाकिस्तानी मीडियाचा जळफळाट झालाय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
अब्बास शब्बीर अली हा पाकिस्तानी पत्रकार आहे. वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी पाकिस्तानातून काही पत्रकार आले आहेत. त्यातील अब्बास हा एक आहे. पण अब्बास हा वर्ल्ड कप मॅचेस कव्हर करण्यासोबत भारतील चांगल्या गोष्टी पुढे आणत आहे. नुकताच त्याने भारतीय रेल्वेतून बंगळुरु ते चेन्नई असा प्रवास केला.
भारताच्या ट्रेनचे ट्रॅक अपग्रेटेड आहेत. सीट्समध्येदेखील गॅप असल्याने दूरच्या प्रवासात मज्जा येते. ही रेल्वे जगातील बेस्ट रेल्वे आहे. रेल्वेमध्ये प्रवास करणारा प्रवाशी हलत नाही, असे त्याने व्हिडीओत सांगितले. ट्रेन खूप स्वच्छ असून यामध्ये मिळालेल्या कॉम्प्लीमेंट्री मीलचेही त्यांनी कौतूक केले. 130 ताशी किलोमीटर ट्रेनचा वेग पाहून हा पत्रकार आवाक् झाला. त्याचा बंगळूर ते चेन्नई हा प्रवास अवघ्या 6 तासांत झाला, यावर त्याला विश्वास बसत नव्हता. भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना खूप मज्जा येते असे त्याने सांगितले.
हा व्हिडीओ पाहता पाहता पाकिस्तानातही व्हायरल झाला. भारतातून या व्हिडीओचं कौतूक केलं जातंय. तर पाकिस्तानी मीडियातून या पत्रकाराला ट्रोल केलं जातंय. पाकिस्तानातल्या ट्रेनदेखील चांगल्या असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहेत.
दुसरीकडे काही पाकिस्तानी युट्यूबर्स स्वत:च्या देशातील ट्रेन्सची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानात ट्रेन सुरु असेल आणि तुम्हाला चालायचे असेल तर तुम्हाला काही सेकंद इकडे तिकडे हलावे लागेल. जर न हलता ट्रेनमधून चालायची स्पर्धा असेल तर तुम्हाला पाकिस्तानी ट्रेनमध्ये हे चॅलेंज स्वीकारता येईल, असे काही युट्यूबर्स म्हणत आहेत.
पाकिस्तानच्या ट्रेनमध्ये मीलचा पर्याय नाही. फक्त इकोनॉमी, ग्रीन लाईनमध्ये ही व्यवस्था आहे. पण त्याची तिकीट 1800 रुपये आहे. भारतातल्या ट्रेनमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते. मी पाकिस्तानच्या ट्रेनमध्ये इतकं स्वच्छ बाथरुम पाहिलं नाही, असे युट्यूबर म्हणतात. पाकिस्तानची ट्रेन इतकी हलते की वॉशरुम वापरणे हे मोठे आव्हान आहे.