IND vs PAK 2022: सुंदर पिचई पाकड्यांच्या निशाण्यावर, Google च्या CEO ने एका वाक्यात केला 'करेक्ट कार्यक्रम'

T20 World Cup 2022: Google CEO सुंदर पिचाई यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र...

Updated: Oct 24, 2022, 05:30 PM IST
IND vs PAK 2022:  सुंदर पिचई पाकड्यांच्या निशाण्यावर, Google च्या CEO ने एका वाक्यात केला 'करेक्ट कार्यक्रम' title=
pakistani fan tries to troll google ceo sundar pichai

Sundar Pichai Viral Tweet: गुगलचे सीईओ सुंदर पिचई अनेकदा ट्विटवर (Tweet) अॅक्टिव असल्याचं दिसतं. दिवाळीनिमित्त सुंदर पिचई यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सुंदर पिचई यांचं कौतूक देखील होताना दिसत आहे. मात्र, काही पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना (Google CEO Sundar Pichai) यांना ट्रोल केल्याचं दिसून आलं. त्याला कारण होत, भारत आणि पाकिस्तान यांत्यातील कालचा सामना...

सुंदर पिचई यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या (Diwali 2022) शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारत पाकिस्तानचाही उल्लेख केला आहे. त्यावरून एका पाकिस्तानी चाहत्यानं पिचई यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पिचई यांनी पाकिस्तानी चाहत्याला 'सुंदर' शब्दात प्रत्युत्तर दिलंय.

सुंदर पिचई यांचं ट्विट - 

सर्वांना हॅप्पी दिवाळी... तुम्ही सर्व तुमचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत दिवाळी आनंदात साजरी करत असाल. आज पुन्हा एकदा मी शेवटची तीन षटक पाहून दिवाळी साजरी केली. टीम इंडियाने काय कामगिरी केलीये, अप्रतिम... असं ट्विट पिचई यांनी केलं. त्यावरून काही पाकिस्तानी नागरिकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा - सुंदर पिचाई यांची मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट

काय म्हणाले पाकिस्तानी चाहते?

एका पाकिस्तानी चाहत्याने (Pakistani trolls) ट्विट करत पिचई यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सुंदर पिचई यांनी सुरूवातीच्या तीन ओव्हर पहायला पाहिजे होत्या, असं पाकिस्तानी चाहता म्हणाला. त्यावर पिचई यांनी भन्नाट उत्तर दिलं.

पिचई यांचं सुंदर प्रत्युत्तर - 

हो मी पाहिल्या... भुवनेश्वर आणि अर्शदिप यांनी काय स्पेल टाकलाय, असं म्हणत पिचई यांनी भुवी आणि अर्शदिपचं कौतूक केलं आणि पाकिस्तानी चाहत्याची बोलती बंद केली.

पाहा ट्विट - 

दरम्यान, भारतीय वंशाचे सुंदर पिचई यांनी भारतीय संघाचं तोंडभरून कौतूक केलंय. 160 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी पहिल्यांदा ढासळली होती. मात्र, विराट आणि हार्दिकने शानदार फटकेबाजी करत भारताचा विजय निश्चित केला. त्यानंतर आता भारत नेदरलॅड आणि साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.