बीटींग रिट्रीट सेरेमनीमध्ये भारतीय जवानासमोर तोंडावर पडला पाकिस्तानी सैनिक, पाहा व्हिडिओ

 हुसैनीवालामध्ये बीटिंग रिट्रीट सेरेमनीमध्ये रविवारी एक विचित्र प्रकार घडला. या दरम्यान पाकिस्तानी रेंजरने आपले संतुलन घालवले आणि भारतीय जवानासमोर पडला.  या घटनेनंतर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी याची जोरदार खिल्ली उडवली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 17, 2017, 07:58 PM IST
 बीटींग रिट्रीट सेरेमनीमध्ये भारतीय जवानासमोर तोंडावर पडला पाकिस्तानी सैनिक, पाहा व्हिडिओ  title=

नवी दिल्ली :  हुसैनीवालामध्ये बीटिंग रिट्रीट सेरेमनीमध्ये रविवारी एक विचित्र प्रकार घडला. या दरम्यान पाकिस्तानी रेंजरने आपले संतुलन घालवले आणि भारतीय जवानासमोर पडला.  या घटनेनंतर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी याची जोरदार खिल्ली उडवली. 

सेरेमनी होत असताना एक प्रेक्षकाने या प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर टाकला , त्यामुळे तो आता खूप व्हायरल होत आहे. हुसैनीवाला येथे पाकिस्तानी सैनिक पडल्यानंतर प्रेक्षकांनी जोराजाारात टाळ्या वाजवल्या आणि आरडाओरडा केला. 

 

अशा प्रकारे पडल्यावर पाकिस्तानी सैनिक खजिल झाला. त्यानंतर त्याने स्वतःला सांभाळले आणि मग उर्वरित सेनेमनी पूर्ण केली.