दिल्लीच्या हिंसक शेतकरी आंदोलनावर पाकिस्तान बरळलं

काश्मीर मुद्यावरही केलं भाष्य 

Updated: Jan 27, 2021, 08:29 AM IST
दिल्लीच्या हिंसक शेतकरी आंदोलनावर पाकिस्तान बरळलं  title=

इस्लामाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (Republic Day 2021) शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनावर पाकिस्तानने (Pakistan on Delhi Kisan Protest) बरळ ओकली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावर टिपणी केली आहे. 'भारत सरकार शेतकऱ्यांचा आवाद दाबण्यात अयशस्वी ठरले आहेत. आता पूर्ण भारत देश शेतकऱ्यांसोबत उभा आहे.' 

पाकिस्तानचे फेडरल सायन्स टेक्नॉलॉजी मंत्री फवाद चौधरी  (Fawad Chaudhry) यांनी मंगळवारी ट्विट करून म्हटलं आहे की,'संपूर्ण जगाला भारत सरकार विरोधी आवाज उठवायला हवी.'

भारताच्या खासगी प्रश्नात नाक खुपसलं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली होती. याच दरम्यान, अचानक शेतकरी उग्र झाले आणि परिस्थिती तणावपूर्वक झाली. बेकाबू झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर करावा लागला. दिल्लीच्या या हिंसक आंदोलनाने पाकिस्तानला देखील विष कालवण्याची संधी मिळाली. यामुळे भारताच्या खासगी प्रश्नावर शाह महमूद कुरैशी आणि फवाद चौधरी यांनी हिंसक आंदोलनावर भाष्य केलं आहे.

  काश्मीरचा मुद्दा देखील चर्चेत 

कुरैशीने काश्मीरचा मुद्दा देखील यावेळी काढला. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या मंत्र्यांनी म्हटलं की, काश्मीर मुद्यावरून भारताचा पक्ष इतका मजबूत आहे मग ते चर्चा करायला का घाबरतात? कुरैशी यांनी पुढे हे देखील म्हटलं की, पाकिस्ताचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताशी अतिशय शांतपूर्वक याबाबत चर्चा केली होती. मात्र यावर कुणीच लक्ष दिलं नाही. भारताने असे कोणतेच पाऊल उचलू नये ज्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होतील.