ओवैसींची राहुल गांधींच्या मंदिर भेटीवर टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज निवडणूक झाल्यानंतर गुजरातला पोहोचले आहेत. जेथे त्यांना सोमनाथ मंदिरात जावून पुजा केली. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 23, 2017, 12:41 PM IST
ओवैसींची राहुल गांधींच्या मंदिर भेटीवर टीका title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज निवडणूक झाल्यानंतर गुजरातला पोहोचले आहेत. जेथे त्यांना सोमनाथ मंदिरात जावून पुजा केली. 

गुजरात निवडणुकीआधी प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल गांधी यांच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता अखिल भारतीय मुस्लिम मजलिस मुस्लिमीनचे (AIMIM) आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांनी देखील राहुल गांधीवर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये मंदिरांमध्ये गेले आणि मुस्लिमांना दुर्लक्ष केले. राहुल गांधी मशिद किंवा दरगाहमध्ये का नाही गेले. कोणत्याही मुस्लीम नेत्यासोबत त्यांचा फोटो देखील समोर नाही आला. अशी टीका ओवैसींनी राहुल गांधीवर केली.

गुजरात निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी जवळपास २७ मंदिरांना भेट दिली होती.