3 हजार हरणांचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहा

Blackbucks Video Viral: हरणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  

Updated: Jul 29, 2021, 02:44 PM IST
3 हजार हरणांचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहा title=

मुंबई : Blackbucks Video Viral: हरणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका रांगेत चक्क एकत्र आणि तेही एक-दोन नव्हे तर संपूर्ण 3 हजार हरणे रस्ता ओलांडतांना दिसत आहेत. जर तुम्ही हे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य पाहिले नसले तर ते पाहू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा व्हिडिओ इतका आवडला की त्यांनी तो पुन्हा शेअर केला आणि खूपच छान, असे पोस्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा शेअर केलेला व्हिडिओ Gujarat Information ने यापूर्वी शेअर केला होता. कॅप्शन देताना म्हटले आहे Over 3000 blackbucks were seen crossing the road at Bhavnagar's Blackbuck National Park.

भावनगरच्या ब्लॅकबक नॅशनल पार्कमध्ये 3000 हून अधिक ब्लॅकबक्स रस्ता ओलांडताना दिसले. 

व्हिडिओ पाहा-

व्हिडिओमध्ये हजारो काळवीट रस्त्याच्या एका बाजूने दुसरीकडे जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गुजरातमधील वेलावदार ब्लॅकबॅक नॅशनल पार्कचा आहे. यास आतापर्यंत 715.1K views मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुन्हा शेअर केला आहे आणि म्हटलेय
Excellent!