फोटोमधील मांजर पायऱ्या उतरतेय की चढतंय यावरून ठरेल तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

आपण अशा गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो की नकारात्मक दृष्टीने हे आपल्या विचारांवर ठरतो

Updated: Oct 31, 2022, 01:38 AM IST
फोटोमधील मांजर पायऱ्या उतरतेय की चढतंय यावरून ठरेल तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन title=

Optical Illusion : आयुष्यात आपल्यासमोर अनेक गोष्टी येत असतात. आपण अशा गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो की नकारात्मक दृष्टीने हे आपल्या विचारांवर ठरते. ऑप्टीकल इल्युजनचे फोटो असे असतात. असाच एका मांजरीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. जो तुम्हाला भ्रमात टाकेल. 

या फोटोमध्ये एक मांजर तुम्हाला पायऱ्यांवर दिसत आहे. परंतू ही मांजर पायऱ्या चढतेय की उतरतेय हे पाहणाऱ्यांच्या विचारांवर अवलंबून आहे.या फोटोकडे तुम्ही कितीही बारकाईने पाहिलं तरी तुम्हाला नक्की सांगता येणार नाही, की मांजर पायऱ्या चढतेय की उतरतेय. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर युजर्सनेही असंख्य प्रतिक्रिया दिल्या.

खरं तर या फोटोकडे तुम्ही कितीही बारकाईने पाहिलं तरी लक्षात येईल की मांजर पायऱ्या उतरताना किंवा चढताना दिसतेय. त्यामुळे तुम्ही जीवनाकडे आशावादी तसेच सकारात्मक वृत्तीने पाहत असाल तर, तुम्हाला मांजर पायऱ्या चढताना दिसून येईल.

जर तुम्हाला मांजर पायऱ्या उतरताना दिसून आली तर,  तर तुम्ही निराशावादी दृष्टीकोन असलेली व्यक्ती आहात. हे कदाचित तुमच्या जीवनातील अनुभवांमुळे असेल, परंतु तुम्हाला जीवनाची नकारात्मक बाजू दिसते. तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही आणि कोणीही तुम्हाला पटकन फसवू शकत नाही.