Optical Illusion:चित्रात दडलाय एक इंग्रजी शब्द, तुम्हाला दिसतोय का?

एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात लोकांच्या डोक्याचा भुगा होतोय.

Updated: May 27, 2022, 02:34 PM IST
Optical Illusion:चित्रात दडलाय एक इंग्रजी शब्द, तुम्हाला दिसतोय का? title=

मुंबईः आजकाल डोळ्यांना फसवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दडलेल्या गोष्टी उघड झाल्यानंतरही दिसत नाहीत

असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात लोकांच्या डोक्याचा भुगा होतोय. चित्रात दडलेला शब्द सकाळी फिरणाऱ्या लोकांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.

तुम्हाला चित्रात चार अक्षरी इंग्रजी शब्द शोधावा लागेल. तुम्हाला त्यात दडलेला शब्द ओळखण्यात काही अडचण येऊ शकते, कारण या चित्राची रचना खूपच तिरकस आहे. असे काही लोक आहेत ज्यांना बराच वेळ चित्र पाहिल्यानंतरही त्यात दडलेला शब्द सापडला नाही.

तुम्ही लाल आणि आकाशी निळ्या रेषांचं चित्र पाहत आहात. या ओळींच्या मध्यभागी चार अक्षरी इंग्रजी शब्द लिहिलेला आहे. जर तुम्हाला हा शब्द अजून सापडला नसेल, तर आम्ही तुम्हाला एका हिंट देतो, लोक हे काम त्यांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी करतात.

आता तुम्ही विचार करत असाल की लोक व्यायामशाळेत जातात किंवा त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा शब्द 'वॉक' आहे.