Optical Illusion : अनेकदा आपल्या डोळ्यासमोर असणारी वस्तू आपल्या लगेच दिसत नाही. पण दुसऱ्याला मात्र लगेच दिसते. यामध्ये आपलीच बघण्याची पध्दत याला कारणीभूत ठरते. असाच एक चित्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहेत. हा फोटोंची खास गोष्ट म्हणजे, ते स्वत:मध्ये एक रहस्यमय फोटो आहे. कारण यामध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात, ज्या आपल्याला शोधून काढायच्या असतात. हे ऑप्टिकल इल्युजन फोटो आपल्या डोक्याला जास्त विचार करायला लावतात, तसेच आपल्या डोळ्यांची परीक्षा घेतात.
सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये अनेक झेब्रा दिसत आहेत. ज्यामध्ये एक वाघ देखील लपलेला आहे. जो शोधून काढण्याचं चॅलेंज दिलं गेलं आहे. चला तर मग लागा कामाला आणि 20 सेकंदात या फोटोमधील वाघ शोधून दाखवा.
तुम्हाला अजूनही या फोटोमध्ये वाघ दिसला नसेत, तर काळजी करु नका, अनेकांना तो शोधता आलेला नाही. आम्ही तुम्हाला तो शोधून काढण्यात मदत करणार आहोत. सर्व प्रथम, या चित्रात उजवीकडे पाहा, तुम्हाला झुडूपांच्या मागे एक वाघ दिसेल. अजूनही तुम्हाला तो दिसला नसेल, तर खाली फोटोमध्ये पाहा.
डोळ्यांना फसवणारी फो फोटो पाहून लोक चकित होतात, परंतु जर तुम्ही तुमची युक्ती आणि डोळ्यांचा नीट वापर केलात तर, तुम्हाला या फोटोमागील सर्व सत्य समोर येतं.