Crime News In Marathi: मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर होते, घरात लग्नाची तयारी सुरू होती. पण शुभकार्य घडण्यापूर्वीच अघटित घडलं अन् एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झाले. एकतर्फी प्रेम प्रकरणात माथेफिरु तरुणाने युवतीची निर्घृण हत्या केली आहे. नंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.
२१ मे रोजी तरुणीचं लग्न होतं, आजपासून कुटुंबीय लग्नाचे विधी सुरु करणार होते. त्याच तयारीत सर्व नातेवाईक होते. त्याचवेळी एक माथेफिरु पिस्तूल घेऊन युवतीच्या खोलीत गेला आणि तिच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गोळ्या झाडल्याने जागेवरच युवती गतप्राण झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील नातेवाईकांनी खोलीकडे धाव घेतली. हे पाहून आरोपीने तिथून पळ काढला व शेजारी राहणाऱ्या मामाच्या गच्चीवर असलेल्या खोलीत लपून बसला.
नीतू नावाच्या मुलीचं २१ मे रोजी लग्न होतं. कुटुंबातील सगळे सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. त्याचवेळी सोनू प्रजापती नीतूच्या खोलीत जाऊन पोहोचला आणि तिला काही कळायच्या आतच तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. आरोपी सोनु एका दूध कंपनीत नोकरीला होता. मयत तरुणी नीतुच्या शेजारी आरोपीचे मामा राहतात. त्यांच्याच घराच्या गच्चीवरुन सोनु तिच्या घरी पोहचला होता.
12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?
नीतूवर गोळी झाडल्यानंतर आरोपी तिथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घरातील सदस्यांनी त्याला पिस्तून घेऊन खोलीबाहेर पडताना पाहिले. त्याचवेळी जमावाने त्याचा पाठलाग केला. जमावापासून बचावासाठी त्याने हवेत गोळीबार करत शेजारीच राहणाऱ्या मामाच्या गच्चीवर पोहोचला.
हवेत गोळीबार करताना आरोपीच्या पिस्तुलमध्ये गोळी फसली. जमाव त्याच्याच पाठी येत असल्याचे पाहुन त्याने एका खोलीत स्वतःला बंद करुन घेतले. त्याला खोलीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने आतमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बाहेर जमलेल्या लोकांना कळताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला व पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हेसुद्धा वाचाः मान्सून लांबला, Maharashtra तील तापमानानं 40 आकडा ओलांडला ; हवामान बदलांमुळं नागरिक हैराण
मयत युवतीच्या भावाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यानेही आत्महत्या केली आहे. हे एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडले आहे. पोलिस या प्रकरणी कसून तपास करत असून लवकरच तरुणाने हत्या का केली याची उकल करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.