'एक देश, एक रेशन कार्ड' योजना १ जून २०२०पासून लागू होणार

१ जून २०२० पासून  एका देशात एक रेशन कार्ड (one nation one ration card) योजना लागू होणार आहे. 

Updated: Dec 4, 2019, 04:42 PM IST
'एक देश, एक रेशन कार्ड' योजना १ जून २०२०पासून लागू होणार title=

मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी. १ जून २०२०पासून एक देश एक रेशन कार्ड (one nation one ration card) मोहीम सुरू राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही भागातून तुमच्याकडे असलेल्या सध्याच्या रेशनकार्डवरच स्वस्त धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

१ जून २०२० पासून  एका देशात एक रेशन कार्ड (one nation one ration card) योजना लागू होणार आहे. 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेचा सर्वात मोठा फायदा दैनंदिन मजूर, कामगार आणि स्थलांतरित कामगारांना होईल. देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना लागू करण्यापूर्वी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांत प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प म्हणून राबविण्यात आला आहे.

सरकारला आशा आहे की, या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अधिक यशस्वी होईल आणि गरजू लोकांना याचा लाभ मिळून ती अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत कोणताही लाभार्थी एकाच रेशन कार्डाद्वारे सवलतीच्या दरात देशातील कोणत्याही वाजवी किंमतीच्या दुकानातून धान्य घेऊ शकतात. या योजनेचा लाभार्थी बायोमेट्रिक आधार कार्डच्या माध्यमातून नोंदविला जाणार आहे.